Sign in
Search
GeoGebra
Home
Resources
Profile
Classroom
App Downloads
घटक ६ शंकू, शंकूछेद
Author:
Shamashuddin Attar GeoGebra Ambassador 2023-24
Activity 1 – विद्यार्थ्यांना आईस्क्रीम कोन, बर्थडे कॅप, पेन्सिलचे टोक, विदूषक टोपी, सर्कसच्या तंबूचे चित्र, भोवरा, धान्याच्या राशीचे फोटो इ. वस्तू हाताळण्यास द्याव्यात. तसेच संबंधित आकारांची माहिती देणाऱ्या slides, video clips दाखवाव्यात. Activity 2 – शंकू तयार करण्याची कृती गणिती संवादातून स्पष्ट करावी. त्यासाठी वर्तुळपाकळी व शंकू यामधील संबंध कृतीद्वारे स्पष्ट करावा. विद्यार्थ्यांना आयताकृती कागद देऊन त्यापासून शंकू तयार करण्यास सांगावे. यावेळी गणिती संवादातून नेमक्या कृतीकडे न्यावे. (विद्यार्थी त्रिकोणातून शंकू तयार करण्याचा प्रयत्न करतील. परंतु, वर्तुळपाकळीचा खालचा भाग वक्राकार आहे, त्यामुळे शंकूचा खालचा भाग सपाट होईल, म्हणून ते वर्तुळपाकळीचा विचार करणार नाहीत) Activity 3 – शंकूची लंब उंची व तिरकस उंची यामधील फरक स्पष्ट करण्यासाठी पुढील उदाहरणाचा वापर करावा. Activity 4 – तयार केलेल्या शंकूच्या मिती (परीघ, लंबउंची, तिरकस उंची) मोजण्यास सांगणे व त्या मितीवरून शंकूचे वक्रपृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ काढण्यास सांगावे. Activity 5 – शंकूच्या उंची व त्रिज्येएवढ्या मितीची वृत्तचिती शंकूच्या तीन पायांनी वृत्तचिती भरते, हे गणिती संवादाने कृतीने स्पष्ट करावे. त्यातून शंकूच्या व वृत्तचितीच्या घनफळाचा सहसंबंध लक्षात आणून द्यावा. Video clip चाही प्रभावी वापर करावा.
शंकूछेद Activity 1 – पेपरग्लास, चहाचा कप, स्टील-काचेचा ग्लास, झाडाची कुंडी यांसारख्या वस्तू विद्यार्थ्यांना हाताळण्यास द्याव्यात. या प्रकारच्या परिसरातील वस्तूंची विद्यार्थ्यांकडून माहिती घ्या. ही सर्व शंकूछेदाची उदाहरणे आहेत. हे शंक्वाकृती वस्तूंशी तुलना करून विद्यार्थ्यांना पटवून द्या. Activity 2 – शंकूला समांतर पद्धतीने आडवा काप घेतल्यास शंकूछेद तयार होतो, हे स्पष्ट करण्यासाठी गणिती संवादाद्वारे शंकूछेद करण्याची कृती करा. या पद्धतीने प्रत्यक्ष काप घेऊन वरीलपैकी कोणत्याही प्रकारचा काप योग्य आहे, ते गणिती संवादाद्वारे उद्धृत करा. Activity 3 – उपलब्ध शंकूछेद आकाराच्या (उदा. गुळाची ढेप) वस्तूंच्या मिती (तळाचा व वरचा परीघ, तिरकस उंची, लंब उंची) मोजण्यास सांगावे. (शंकूछेदाच्या बाहेरील कडांपासून लंबरित्या दोरा टांगल्यास लंबउंची मोजता येऊ शकेल) Activity 4 – बादलीची मिती मोजून बादलीत किती घ.सेमी किंवा किती लिटर पाणी मावेल, ते विद्यार्थ्यांना मोजण्यास सांगावे.
New Resources
JLA Eri Chan
An Apple a Day...
JLA Copy of Eri Chan
רישום חופשי
Bessel Function
Discover Resources
Australia Rules
Untitled
venn-diagram diagram
GM2-04-P2-Q4 Convert Units of Volume
区分求積法
Discover Topics
Boxplot
Triangles
Subtraction
Fractions
Quadrilaterals