निरीक्षण आणि शोध

निरीक्षण आणि शोध

महत्व मापन शिक्षकमित्रहो! महत्व मापन म्हणजे, ‘मोठेपणाचे मापन.’ हा घटक अध्यापन करण्यापूर्वी खालील बाबी लक्षात घ्या. विविध आकार, वस्तू इ.ची. विद्यार्थ्यांकडून यादी प्राप्त करून घ्या. प्राप्त वस्तूंचे द्विमितीय, त्रिमितीय आकृत्यांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गीकरण करावयास सांगा. द्विमिती व त्रिमिती चित्रपटांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवून दोन्हींतील फरक ओळखण्यास सांगा. निसर्गनिर्मित कोणतीही वस्तू कोपरा असलेली नाही, विद्यार्थ्यांना निरीक्षणातून तसेच गणिती संवादातून जवळच्या वस्तूंकडून परिसरातील वस्तूंकडे न्या. विद्यार्थ्यांना गणिती संवादास प्रवृत्त करून ‘महत्व मापन’ या घटकाची ओळख करून द्या. उदा. १ रुपया व ५० पैसे मिळून एकूण किती रक्कम तयार होते, एकक एकाच पद्धतीत असावे, हे सांगण्याकरिता हे उदाहरण सोयीचे. घटकाचे अध्यापन सुरू करण्याअगोदर हे करा. महत्वमापन संकल्पना आकलन होण्यासाठी आवश्यक पूर्वज्ञान. संज्ञा (त्रिज्या, व्यास, परीघ, जीवा, केंद्रीय कोन,कंसाचे प्रकार, क्षेत्रफळे) बंदिस्त बहुभुजाकृतीसंबंधीच्या संज्ञा (लांबी, रुंदी, उंची, कर्ण, शिरोबिंदू, कडा, पृष्ठे, क्षेत्रफळ, घनफळ, परिमिती) कोनमापन खर्च – अपूर्णांक संख्यांवरील क्रिया, एकाच एकक पद्धतीत रूपांतरण. या संज्ञांचे आकलन होण्यासाठी activity chart चा वापर करा. त्यामध्ये उद्देश, कृती, साहित्य, सांख्यिकी, माहितीयुक्त तक्ता, त्यातून मिळणारे. निष्कर्ष इ.चा समावेश करा. विद्यार्थ्यांना परिसरात आढळणाऱ्या द्विमितीय व त्रिमितीय वस्तूंची क्षेत्रफळे काढण्यास सुचवा.