घटक १

घटक १

बंदिस्त आकृतींची क्षेत्रफळे Activity -    १) चित्रे, फोटो, नेलबोर्ड, काड्यांची रचना इ.द्वारे बंदिस्त असणाऱ्या व नसणाऱ्या आकृती विद्यार्थ्यांना ओळखण्यास सांगावे व तसे वर्गीकरण करावे. Activity 2 – नेलबोर्डचा वापर करून गणिती संवादांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या बाजूंची लांबी, कोनांची मापे काढण्यास सांगावे व त्याद्वारे चौकोनाचा प्रकार ठरवावा. Activity 3 -  नेलबोर्ड, ग्राफपेपर बोर्ड आदींचा उपयोग करून चौकोनाच्या बाजू, कोन, कर्ण इ. माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नोंदवण्यास सांगावी व त्याद्वारे चौकोनाचा प्रकार ठरवावा. Activity 4 – शिक्षकांनी ओळंबा दोरी विद्यार्थ्यांना पुरवून लंबांतर मोजण्यासंबंधीच्या सूचना देऊन नोंदी करावयास सांगावे. Activity 5- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बंदिस्त आकृतींच्या कागदी आकृत्या पुरवून त्या आकृतींच्या सर्व बाजूंची लांबी मोजण्यास सांगून सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज करावयास सांगावी.